शबनम न्युज | मुंबई
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी सध्या ‘जोगिरा सारा रा’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, तो अनेक ठिकाणी मुलाखत देत आहे, अशाच एका मुलाखतीत त्यांनी डिप्रेशन वर आपले वक्तव्य केले आहे. डिप्रेशन हा शहरी आजार असून गावात कोणालाही होत नाही असे ते म्हणाले.
डिप्रेशन ही शहरे कॉन्सेप्ट आहे. गावातील लोकांना हे होत नाही. मी जर वडिलांना डिप्रेस्ड झालो असे सांगितले, तर ते मला चापट मारतील. मी ज्या ठिकाणाहून येतो तिथे डिप्रेशनची नाव काढणे चुकीचे ठरेल. तिथे कोणालाच डिप्रेशन येत नाही, सगळे आनंदी असतात, पण जेव्हा मी शहरात आलो, तेव्हा मला एंक्झायटी, डिप्रेशन बायपोलर याबद्दल कळाले.
तो पुढे म्हणाला, डिप्रेशन हा शहरी आजार आहे. इथे प्रत्येक जण आपल्या छोट्यातल्या छोट्या भावनेला खूपच वाढवून सांगतो. आता एखादा मजूर किंवा फुटपाथवर राहणाऱ्या माणसाला विचारा की, डिप्रेशन काय आहे. त्याला माहित नाही जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ना त्यातही नाचतात, त्यांना अजिबातच डिप्रेशन वाटत नाही, जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा अशा प्रकारचा आजारही येतो.