शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
प्रभाग क्रमांक 14 मधील आकुर्डी खंडोबा मंदिर शेजारी उद्यानासाठी आरक्षित असलेल्या आरक्षित भूखंडावर उद्यान विकसित करा, अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निखिल दळवी यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, १४ मधील आकुर्डी खंडोबा मंदिर शेजारी पिंपरी चिंचवड मनपाचे उद्यानसाठी आरक्षित असलेला (आरक्षण क्रमांक ८८) हा आरक्षित भूखंड पिंपरी चिंचवड मनपाच्या सन ०६/०१/ १९७८ रोजी मधील प्रस्ताव मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक ८८ उद्यान साठी आरक्षित केला गेला होता. सदर भूखंड मनपाने १२/१२/१९८५ रोजी सदर भूखंड मनपाने उद्यान विकसित करण्यासाठी ताब्यात घेतला होता. सदर भूखंड मनपा ने ताब्यात घेऊन तब्बल ३८ वर्ष उलटून गेले तरी सदर उद्यान साठी आरक्षित असलेल्या भूखंडावर मनपा ने उद्यान विकसित का केले नाही असा प्रश्न आत्ता स्थानिक नागरिकांना पडला आहे या भुखंडा जवळील परिसरातील नागरिकांसाठी एक ही मोठे उद्यान उपलब्ध नाही या परिसरात लहान मूलांना खेळण्यासाठी व नागरिकांना वॉकिंग साठी उद्यान उपलब्ध नाही. स्थानिक नागरिकांची मागणी आहे की या उद्यान साठी आरक्षित असलेल्या भूखंडावर लहान मुलांना खेण्यासाठी व नागरिकांना वॉकिंग करण्यासाठी वॉकिंग ट्रॅक तयार करून उद्यान विकसित करावे अशी स्थानिक रहिवासी नागरिकांच्या मागण्या आहेत तरी सदर आरक्षित भूखंडावर लवकरात लवकर उद्यान विकासात करावे, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.