शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर आता जागतिक पातळीवर सर्वात जास्त वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जाते. येथे अत्याधुनिक सेवा सुविधांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात देखिल आधुनिक व प्रशस्त इमारतींची गरज आहे. माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांच्या पाठपुराव्याने नगरसेवक शाम लांडे यांनी कासारवाडीतील श्री छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालयाच्या भुमिपूजनासाठी विशेष प्रयत्न केले. आता कासारवाडीतील गोर गरीब नागरिकांना आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुरच्या शाळेत पाठविण्याची गरज भासणार नाही. परिसरातील विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.
गुरुवारी (दि. 28 ऑक्टोबर) कासारवाडी येथे प्रभाग क्र. 20 मधिल नव्याने उभारण्यात येणाऱ्या श्री छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय (मराठी माध्यम) कासारवाडी ह्या नवीन इमारतीचे भुमिपूजन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, नगरसेवक शाम लांडे, नगरसेविका सुजाता पलांडे, नगरसेवक माउली थोरात, सामाजिक कार्यकर्ते राजू शेळके, रमेश बाप्पू लांडगे, अमोल मोटे, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष महाले, बबनराव टोपे, शरद बांगर, देवराम तनपुरे, रतन लांडगे, सयाजी लांडे, संजय लांडे, कैलास लांडे आदी उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक करताना नगरसेवक शाम लांडे म्हणाले की, मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. ज्या प्रमाणे येथे श्री छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालयाची इंग्रजी माध्यमाची अत्याधुनिक सर्व सेवा सुविधायुक्त इमारत उभारण्यात आली आहे. तशीच इमारत मराठी माध्यमासाठी देखिल उभारण्याचे माझे स्वप्न होते. यासाठी ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी मला मार्गदर्शन केले आणि महापौरांच्या हस्ते या प्रकल्पाचे भुमिपूजन होत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. या प्रकल्पामध्ये 24 वर्ग असून 1 ली ते 10 वी पर्यंतचे मराठी माध्यम मधून शिक्षण देण्यात येणार आहे. तळमजल्यावर पोस्ट ऑफिस, आरोग्य ऑफिस, प्राचार्य कार्यालय, शिक्षक कार्यालय, पहिल्या मजल्यावर स्टाफ रूम, ऑफिस, मिटिंग हॉल, तिसऱ्या मजल्यावर आर्ट आणि क्राफ्ट हॉल, चौथ्या मजल्यावर सांस्कृतिक हॉल, पाचव्या मजल्यावर प्रयोगशाळा अशा प्रकारे अत्याधुनिक इमारत होणार आहे. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण सुद्धा करण्यात येणार आहे. या प्रकल्प बांधण्यासाठी 13 कोटी 37 लाख एवढा खर्च होणार आहे अशी माहिती नगरसेवक शाम लांडे यांनी दिली.