शबनम न्युज | पुणे
कसबा विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. या निर्णयानुसार आपचे उमेदवार किरण कद्रे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. नुकतेच चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमधून आम आदमी पक्षाचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता.
सध्या आम आदमी पक्षाने विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही जोमाने लढवणार असल्याचे आपकडून सांगण्यात आले.
Advertisement