शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचार प्रमुख पदी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे.
भाऊसाहेब भोईर हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून, माजी नगरसेवक आहेत. त्यांनी यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढविलेली आहे. निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव नाना काटे यांच्या प्रचार प्रणालीला मोठा लाभ मिळवून देईल, या उद्देशाने भाऊसाहेब भोईर यांची प्रचार प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. सध्या चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत वेगवेगळ्या घटनांमुळे रंगत वाढत चालली आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या उमेदवारीने नाना काटे यांना धोका निर्माण होऊ शकतो, तसेच कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना निवडून आणायचेच, या उद्देशाने राष्ट्रवादी कार्यरत झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचा हुकमी इक्का असलेले नेते भाऊसाहेब भोईर यांची प्रचार प्रमुख पदी निवड ही करण्यात आली आहे.