शबनम न्यूज | बारामती
धनुष्यबाणाच्या वादात मी पडणार नाही, त्यावर मी स्पष्टपणे सांगितले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर, उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. त्यानंतर धनुष्यबाणाचा वाद सुरू आहे. या वादात आपण पडणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत बोलताना पवार म्हणाले, “सहकार परिषदेच्या समारंभासाठी ते पुण्यात आले होते. सहकार परिषदेचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. याबाबत आमच्यात मतभेद नाहीत. धोरणात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे आज योग्य वाटले.” असे शरद पवार यावेळी म्हणाले.
Advertisement
Advertisement