छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अल्पसंख्यांक आघाडी वतीने साजरी
शबनम न्यूज: पिंपरी चिंचवड: प्रतिनिधी;
19 फेब्रुवारी 2023 रोजी *रयतेचे राजे, भारताचे महापुरुष , छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती रिपब्लीकन पार्टी ऑफ़ इंडिया (आठवले) अल्पसंख्यांक आघाडी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस मा खाजाभाई शेख* यांच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणिस मा खाजाभाई शेख , शहाराध्यक्ष मा शादाब पठाण, मा फय्याज भाई सनदी , अमजद जमादार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यावेळी एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. सदरहु छोटेखानी कार्यक्रमास माजी अध्यक्ष शेख लाल नदाफ, मौलाना अकबर, हाफीज जावेद, इम्तियाज जमादार, दिपक वारभुवन, शौकत भाई, विकास चव्हाण, अश्वीनी सहारे, स्वपनील सोनपावरे , अशोक कराळे आदी माननीयांची उपस्थीती होती