मनोज भाऊ जरी युवा मंच, नारीशक्ती महिला मंच व कुटुंब आरोग्य फाउंडेशन वतीने सामाजिक उपक्रम
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनोज भाऊ जरे युवा मंच व नारीशक्ती महिला मंच व कुटुंब आरोग्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील सानी चौक चिखली परिसरातील नागरिकांसाठी सदरचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रभागातील असंख्य नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदविला व विविध प्रकारच्या आरोग्याच्या तपासण्या यांचा लाभ घेतला यावेळी नागरिकांनी रक्त तपासणी मधुमेह तपासणी हृदयरोग तपासणी व उपचार थायरॉईड तपासणी तसेच महिला भगिनींनी महिलांसंबंधीचे विविध आजारांची तपासणी अशा विविध तपासण्यांचा लाभ घेतला यावेळी ज्या नागरिकांनी मागील आरोग्य शिबिरात सहभाग नोंदविला होता त्या सर्व नागरिकांना सर्टिफिकेट देण्यात आले यावेळी मनोज भाऊ जरे जनसंपर्क कारले येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रम आस विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली