मतदारांनो सावधान भाजपवाले भावनिक मुद्दा पुढे करून दिशाभूल करीत आहेत -माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे
पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी :
चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकी करिता भाजप, राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडी व युतीचे सर्व पक्ष जोरदार प्रचार आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी करत आहेत, स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजप वतीने स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीतून बंडखोरी करत राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून या निवडणुकीत तिरंगी लढत निर्माण केली आहे.
या निवडणुकीमध्ये भाजप वतीने मतदारांना भावनिक केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका संगीता (नानी ) ताम्हाणे यांनी केला आहे त्यांनी मतदारांना आवाहन करीत सांगितले आहे की,
मतदारांनो! हे काळजीपुर्वक वाचा, तुमच्या लक्षात येईल कि भारतीय जनता पार्टी किती भ्रष्टाचारात गुंतली होती, खुद्द आमदार कै. लक्ष्मणभाऊ जगताप यांना आयुक्तांना तक्रार करावी लागली होती. ही निवडणूक कोणा व्यक्ति विरोधात नाही, ही निवडणूक भाजपाने लादलेल्या महागाई बेरोजगारी, चार चार कंपन्या येथून या गुजरात्यांनी नेल्या ह्यावर आहे पंरतू पिंपरी- चिंचवड मधील भाजपचे शहराध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी त्यावर काही बोलत नाही, गॅसदर वाढीबद्दल, येणार्या वाढीव वीजबीलाविरोधात हे भाजपवाले गप्प आहेत, भावनिक मुद्दा पुढे करून ते तुमची दिशाभुल करीत आहे, मतदारांनो! जागे व्हा! ह्यांना फसू नका. इथला विकास राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.याउलट स्मार्ट सिटी प्रकल्प आपल्यावर लादून कोट्यावधीचा भ्रष्टाचार या भाजपवाल्यांनी केला. आणि आता सहानभूती मिळावी म्हणून यांचा खटाटोप सुरु आहे. मला माहित आहे, हे सर्व तुम्हाला कळतं ! कारण तुम्ही सुज्ञ आहात. आपली विश्वासु सौ.संगिता(नानी)प्रभाकर ताम्हाणे (नगरसेविका पिंपरी-चिंचवड महानगर पालिका)
अशा आशयाचे आवाहन माजी नगरसेविका संगीता (नानी) ताम्हाणे यांनी मतदारांना केले आहे तसेच भारतीय जनता पार्टीच्या या भावनिक दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी न पडता महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना विकासाच्या मुद्द्यावर मतदान करून निवडून द्यावे असेही आवाहन माजी नगरसेविका संगीता( नानी) ताम्हाणे यांनी केले आहे.