शबनम न्युज | सांगवी
शितोळे शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे, हे त्यांना मिळालेल्या बक्षिसावरून समजून येते एवढ्या मोठ्या प्रमाणावर या शाळेने बक्षीस वाटप केले म्हणजे या परिसरातील एक उत्तम उपक्रमशील शाळा आहे असे वाटते. विद्यार्थ्यांनी असेच यश संपादन करावे असे मत सांगवीच्या छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. शकुंतलाबाई आनंदराव शेततळे प्राथमिक विद्यालय, शिशु विहार ,नूतन माध्यमिक विद्यालय ,मॉडर्न नर्सरी व सुंदरबाई भानसिंग पूजा गुरु गोविंद इंग्लिश मीडियम स्कूल सांगवी आयोजीत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात डॉ.दिलीप गरुड यांनी व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वामध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे आणि उद्याचा उत्कृष्ट भारतीय नागरिक तयार होत आहेअसे वाटते आणि संस्थेचे पदाधिकारी पेशाने शिक्षक असल्याने शाळेतील वातावरण हे संस्कारक्षम व शैक्षणिक वातावरणात असल्याचे जाणवले असे ते म्हणाले त्यांनी सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे, पालक व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले.
यावेळी शाळेतील कला, क्रीडा शैक्षणिक विभागात प्रावीण्य मिळवलेल्या एकूण चारशे पन्नास विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. तसेच शिक्षक व पालकांसाठी ही स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या शिक्षक व पालकांनाही गौरविण्यात आले .यामध्ये पाककला ,संगीत खुर्ची, गीत गायन, क्रिकेट इत्यादी स्पर्धा मधील विजेत्या पालक व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेच्या मैदानावर राज्य पुरस्कार प्राप्त संस्थेचे अध्यक्ष मा. आबासाहेब जंगले यांच्या अध्यक्षतेखाली समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ञ डॉक्टर दिलीप गरुड , संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले,संस्थेचे उपाध्यक्ष पोपटराव भसे ,सतीश साठे देशमुख खजिनदार रामभाऊ खोडदे ,सचिव तुळशीराम नवले ,सहसचिव जयवंत आढाव ,कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, सदस्य प्रकाश ढोरे, सीमा कळंत्रे, मुख्याध्यापक शिवाजीराव माने ,इंग्रजी माध्यम प्रमुख शोभा वरटी,माध्यमिक प्रमुख शितल शितोळे ,बालवाडी प्रमुख संगीता सूर्यवंशी, शितल गरसुंड, प्रशांत विभूते, समीर ढेरंगे , शिक्षक पालक संघ व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सदस्य, शिक्षक वृंद, सेवक वर्ग ,पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी केले. निवेदन व आभार दत्तात्रय जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक सेवक यांनी परिश्रम घेतले.