शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल आज येत आहे. थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर होत्या तर दुसऱ्या फेरीमध्ये नाना काटे तर तिसऱ्या फेरीत अश्विनी जगताप 1213 मतांनी आघाडीवर होत्या. तर त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. चौथ्या फेरीतही अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवत 13 हजार 747 मते मिळविली. आता परत पाचव्या फेरीमध्ये अश्विनी जगताप यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्या 2947 मतांनी आघाडीवर आहेत.
अश्विनी जगताप यांना 16,522 मते मिळाली आहेत. तर नाना काटे यांना 13,575 आणि राहुल मलाटे यांना 5000 मते मिळाली आहेत.