शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल आज येत आहे. थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
- मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर होत्या.
- दुसऱ्या फेरीमध्ये नाना काटे तर तिसऱ्या फेरीत अश्विनी जगताप 1213 मतांनी आघाडीवर होत्या. तर त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.
- चौथ्या फेरीतही अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवत 13 हजार 747 मते मिळविली.
- आता परत पाचव्या फेरीमध्ये अश्विनी जगताप यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्या 2947 मतांनी आघाडीवर होत्या.
- सहाव्या फेरी अखेर अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. जगताप यांना ३ हजार 319 मतांनी आघाडी कायम ठेवली आहे .
- सातव्या फेरीत अश्विनी जगताप आघाडीवर असून, त्यांना 24,417 मते मिळाली. तर नाना काटे यांना 20,318 आणि राहुल कलाटे यांना 8239 मते मिळाली.
- आठव्या फेरीत देखील आश्विनी जगताप 4923 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना एकूण 28 हजार 20 मते मिळाली तर नाना काटे यांना 23 हजार 83 मते मिळाली आणि राहुल कलाटे यांना 9291 मध्ये मिळाली आहेत.
- दहाव्या फेरीत अश्विनी जगताप 4716 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना एकूण 35 हजार 228 मते मिळाली. नाना काटे यांना 27 हजार 794 आणि राहुल कलाटे यांना 10 हजार 669 मते मिळाली.
- तेरावी फेरी अखेर आश्विनी जगताप 8 हजार 204 मतांनी आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना एकूण 45 हजार 450 मते मिळाली तर नाना काटे पिछाडीवर असून त्यांना 37 हजार 226 मते मिळाली आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे तिसरे क्रमांकावर असून त्यांना 13 हजार 384 मते मिळाली.
- 14 व्या फेरीत देखील आश्विनी जगताप 8 हजार 327 मतांनी आघाडीवर आहेत.
- चिंचवड मध्ये पंधराव्या फेरीतही अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना 15 व्या फेरीमध्ये 52 हजार 756 मते मिळाली आहे तर महाविकास आघाडीचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांना 43 हजार 657 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 16 हजार 914 मते मिळाली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयाच्या मार्गावर आहेत. स्व. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अश्विनी जगताप यांना मिळणारी सहानुभूती या जोरावर अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
- अठराव्या फेरीतही अश्विनी जगताप 11 हजार 83 मतांनी आघाडीवर आहेत. सुरुवातीपासूनच अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.
Advertisement