शबनम न्युज | पुणे
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यामध्ये काटे ची टक्कर सुरू आहे. पहिल्या फेरी पासून रवींद्र धंगेकर यांनी आपली आघाडी कायम ठेवली असून, नव्या फेरीत देखील त्यांनी बाराशे मतांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. त्यांना 30 हजार 500 मतं मिळाली असून हेमंत रासने यांना 27 हजार 175 मते मिळाली आहेत.
- रवींद्र धंगेकर नवव्या फेरीत 4481 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना 34,741 मते मिळाली तर हेमंत रासने यांना 30,260 मते मिळाली आहेत.
- कसब्यामध्ये बारावी फेरीत रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. त्यांना एकूण 45,504 मते मिळाली. तर हेमंत रासने यांना 40,892 मते मिळाली.
- कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांच्या कार्यकर्त्यांकडून विजयी जल्लोषाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता ४८५० मतांची आघाडी आली आहे.
- सोळाव्या फेरी अखेर रवींद्र धंगेकर 6,927 मतांनी आघाडीवर आहेत. कसबा मतदारसंघात चुरशीची लढत सुरू आहे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत त्यांची आघाडी सोळाव्या फेरीतही कायम असून त्यांना एकूण 60 हजार 657 मते मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना 53 हजार 230 मते मिळाली.
- कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांचा विजय निश्चित झाला आहे. कसबा मध्ये कार्यकर्त्यांचा जोरदार विजयाचा जल्लोष सुरू आहे.
Advertisement