शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड : नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाउंडेशनच्या वतीने ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रम व स्ंदन बाल आश्रम थेरगाव येथील 18 वर्षाखालील १५० मुला-मुलींना दिवाळी सणानिमित्त मुलांच्या मनपसंतीनुसार काळेवाडी येथील जैनम सिलेक्शन मधुन कपडे, खाऊ,व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करून देण्यात आले. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून येत होता. यावेळी मा.विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री. .विठ्ठल उर्फ नाना काटे, श्री.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.सागर पाडाळे, श्री ओम साई मतिमंद मुलांची आश्रम भुगाव ,स्पंदन बाल आश्रम थेरगाव अध्यक्ष मनोज मस्के, उद्योजक उमेश भाई काटे, साद सामाजिक संस्था, विकास पवार, निसार भाई शेख, महेश जाधव, विकास मुंगवडे, कमांडो मनोज साळवी, फ्लाईंग वूमन चे अध्यक्ष छायाताई देसले व ईतर मान्यवर व संस्थेचे सभासद आदी उपस्थित होते.