शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड :सध्याच्या आधुनिक काळात लहान मुले कले पासून दुरावत चालली आहे, प्रत्येक मुला मुलींच्या बालकांच्या हातात मोबाईल असल्याने वाचन तसेच कला या पासून मिळणाऱ्या आनंदास लहान मुले मुकली आहेत, या लहान मुलांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी याकरिता अमोल तुकाराम भालेकर यांच्या शिवयोद्धा प्रतिष्ठान वतीने किल्ले बनवा सपर्धा हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील शिवयोद्धा प्रतिष्ठान वतीने किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे दिवाळी निमित्त लहान मुलांचा वयोगट पाच ते पंधरा वर्षे यांच्याकरिता सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम पाच क्रमांक विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी दहा नोव्हेंबर 2023 पर्यंत ची मुदत देण्यात आली आहे. स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांनी केले आहे.
सदर स्पर्धा पिंपरी चिंचवड शहरातील रुपीनगर, तळवडे ,सहयोग नगर करिता मर्यादित आहे. सदर स्पर्धेत दहा नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या दोन दिवसात निरीक्षण करण्यात येणार आहे .या निरीक्षणात विजयी उमेदवारास आकर्षक असे बक्षीस दिले जाणार आहे. अशी माहिती आयोजक शिव योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.