शबनम न्युज | पिंपरी
रमजान ईद निमित्त सोमनाथ नगर वडगाव शेरी पुणे येथे शेर-ए-आली सोशल फाउंडेशन महा.राज्य यांच्या वतीने
ईद मिलन व गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप व लहान मुलांना खाऊ वाटप तसेच शिरखुर्मा वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे मा.राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली शेख उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन या फाउंडेशनचे संस्थापक फिरोज भाई खान,अध्यक्ष चिरागभाई खान,अफजलभाई खान,सँन्डीभाई शिंदे,साहिलभाई शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.
Advertisement