शबनम न्युज | पिंपरी
एका कंपनीच्या भिंतीचा पत्रा वाकवून रॅकवर ठेवलेले कॉपरचे बंडल, पत्र्याच्या पट्ट्या असा एकूण ३ लाख ४५ हजार ३१५ रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे.
ही चोरी सोमवारी (दि. २४) पहाटे निघोजे येथील पॉनलटेक कंपनी मध्ये घडली. याप्रकरणी वेणू कृष्णन (वय ६२ रा. पिंपरी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २८) फिर्याद दिली असून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement
पॉनलटेक कंपनी मध्ये रॅकवर ठेवलेले ६ वेगवेगळ्या केबलचे बंडल, १० फूट लांबीच्या १७४ किलो वजनाच्या कॉपरच्या पट्या असे एकूण ३ लाख ४५ हजार ३१५ रुपयांचे साहित्य चोरून पाटी नेले आहे.
Advertisement