शबनम न्युज | पुणे
लोकसभा निवडकीचे वारे महाराष्ट्रात फिरत असून, काळ काँग्रेस पक्षाच्या वतीने सात उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
त्या पार्श्वभूमीवर रविंद्र धंगेकर म्हणाले की, मी आजवर १० निवडणुका लढवल्या आहेत.त्या प्रत्येक निवडणुकीत जनता माझ्या पाठीशी राहून मला विजयी केले आहे.
पुढे ते म्हणाले, पुणे लोकसभा निवडणूक ही जनतेची असून चुरशीची होणार नाही. मागील दहा वर्षात भाजपचा कारभार जनतेने पहिला आहे.त्या कारभाराला देशातील जनता वैतागली आहे.ही पुणेकरांची लढाई असून ही लढाई पुणेकर जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि मी पुणेकर नागरिकांचा उमेदवार असणार आहे.पण आज एक सांगू इच्छितो की,मागील दहा वर्षांत सर्व सामान्य नागरिकांना भाजप फसवित आले आहे.तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला फसविणार हे मात्र निश्चित अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.