शबनम न्युज | पुणे
काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली, धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असणारे पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल नाराज यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, मी पक्षाचे काम केले, सर्व घटकातील नागरिकांशी जोडला गेलो आहे, मी प्रभागात काम केले आहे, तर माझ्यात कमी काय आहे, असा प्रश्न काँग्रेसचे आबा बागूल यांनी उपस्थित केला. निष्ठावंतांना न्याय देणार नसाल तर न्याययात्रेचा उपयोग काय? मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे, वयाची सत्तरी आली. आताच काँग्रेसमध्ये आलेल्या, आमदार असलेल्या व्यक्तीलाच पुन्हा उमेदवारी का, असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
आबा बागूल म्हणाले, की निवडून येणारा उमेदवार पक्षाने दिला असल्याने आमच्या नाराजीने काय फरक पडते? राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहे. माझी पूर्ण तयारी आहे. मी नाना पटोले यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना भेटून लढण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील निर्णय घेणार आहे. अन्य पक्षांच्या ऑफर असताना मी बाहेर पडलो नाही. मी पक्षाच्या विरोधात नाही. एक व्यक्ती एक पद हे तत्त्व कुठे गेले अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.