शबनम न्यूज | चिंचवड
आपला हा विजय स्वर्गीय लक्ष्मण जगताप व चिंचवडच्या जनतेला समर्पित करीत असल्याचे नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आपल्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप या 29 व्या फेरी मध्ये आघाडी वर आहेत, त्यांना एक लाख आठ हजार 344 महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना 83 हजार पाच तर बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 30 हजार 363 मते मिळाली आहे. अश्विनी लक्ष्मण जगताप हे विजयाच्या मार्गावर आहेत त्यांनी आपला हा विजय आपल्या कार्यकर्त्यांसमवेत साजरा करताना स्वर्गीय लक्ष्मण जगताप व पिंपरी चिंचवडच्या जनतेला हा विजय समर्पित केला आहे.
Advertisement