शबनम न्यूज | पुणे
आज चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा विधानसभा मतदारसंघ या दोन्ही मतदार संघाच्या पोटनिवडणुका पार पडल्या. 27 फेब्रुवारी रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान झाले. त्यानंतर आज मतदान मोजणीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये चिंचवड मध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर कसबा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे 72 हजार 599 मतांनी विजयी झाले आहेत. यानंतर राज्याची विरोधी पक्षनेते यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अजित पवार म्हणाले, “कहीं खुशी, कहीं गम” सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका ठिकाणी विजय मिळविला तर दुसऱ्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. मात्र चिंचवड मध्ये मतविभागणी मुळे पराभव स्वीकारावा लागला, असण्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. तसेच कसबा मतदार संघात विजयी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.