शबनम न्यूज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून, भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे. त्यांना एकूण 1,35,434 मते मिळाली आहे. 36 हजार 168 जास्त मताने त्यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विरोधात असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना 99,343 मते मिळाली तर बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना तिसऱ्या क्रमांकाचे 44,082 मते मिळाली आहेत.
चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव हा राहुल कलाटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळेच झाला असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नसता तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा विजय झाला असता असे म्हटले आहे. तर अश्विनी जगताप यांनी आपला विजय हा स्व. लक्ष्मण जगताप यांना तसेच चिंचवडच्या जनतेला समर्पित केला आहे.