शबनम न्यूज / पिंपरी
कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा आकुर्डी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.हॉस्पिटलचे उदघाटन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर मा.उषा माई ढोरे व मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या उदघाटन प्रसंगी महापालिका आयुक्त मा.राजेश पाटील,अतिरिक्त आयुक्त ढाकणे साहेब, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके,मा.उपमहापौर शैलजाताई मोरे,नगरसेविका वैशालीताई काळभोर,नगरसेविका शर्मिलाताई बाबर,नगरसेविका मिनलताई यादव व आकुर्डी भागातील सामान्य नागरिकांसाठी सर्वसोयीयुक्त रुग्णालय व्हावे यासाठी गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा,प्रयत्न करणारे स्थानिक नगरसेवक प्रमोद प्रभाकर कुटे उपस्थित होते.
Advertisement