पिंपरी चिंचवड , दिघी –
पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरातील राष्ट्रवादीचे युवा नेते मंगेश अस्वले यांनी संपूर्ण दिघी परिसर हा राष्ट्रवादीमय करून राष्ट्रवादी पक्षाला दिघी मध्ये मंगेश अस्वले यांच्या रूपात एक नवीन नेतृत्व तयार होत असल्याचे संकेत दिले आहे. दिघी परिसरात ठीक-ठिकाणी मंगेश अस्वले यांच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर वाढदिवसाच्या शुभेच्छा तसेच दिनविशेष शुभेच्छा देणारे बॅनर असून, या बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष हा संपूर्ण दिघी परिसरात प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम मंगेश अस्वले यांच्या माध्यमातून होत आहे. घराघरात राष्ट्रवादीची चर्चा यामुळे होत असून, मंगेश अस्वले हे दिघी परिसरात राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व तयार होत असल्याचे बोलले जात आहे.
मंगेश असवले हे सामाजिक कार्यात, दिघी परिसरात अग्रेसर आहेत. सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच मूलभूत प्रश्न सोडविण्याकरिता मंगेश अस्वले नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. दिघी परिसरात राष्ट्रवादी पक्षाची पाळीमुळे घट्ट करण्याचे काम मंगेश अस्वले करीत आहेत.
दिघी परिसरात राष्ट्रवादी अंतर्गत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम मंगेश अस्वले यांच्यावतीने राबविले जात आहेत. तसेच त्यांच्या या सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात दिघी परिसरात राष्ट्रवादी पक्षाचे एक सक्षम नेतृत्व म्हणून मंगेश अस्वले यांच्याकडे पाहिले जात आहे.