शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
हिंजवडीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेसोबत बलात्कार केले. त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून तिला 60 लाख रुपयेला गंडले. तसेच महिलेला मारहाण करून, गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना हिंजवडी भागात घडली. सप्टेंबर महिन्यापासून ते 19 फेब्रुवारी 2023 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी महिला फिर्यादीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मुनेश शर्मा व शुभम शर्मा या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनिशने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून क्रेडिट कार्ड वरून 60 हजार रुपये गंडले. हाताने मारहाण करून गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. या झटापटीत फिर्यादी यांच्या उजव्या हाताला दुखापत पोहोचली. तसेच मुनेषचा भाऊ शुभम शर्मा याने फिर्यादी यांची बदनामी करत सोशल मीडियाद्वारे तू कॉल गर्ल आहेस असे म्हणत बदनामी करू व तुझ्या आई वडिलांना घरात घुसून मारहाण करू अशी धमकी देखील दिली. याबाबत दोन्ही आरोपींविरोधात भा.द.वि. कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.