शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
आज जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहाने साजरा होत असताना पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे युवक शहर उपाध्यक्ष प्रसाद कोलते व सौ प्रिया प्रसाद कोलते यांच्यावतीने आरोग्य महिला कर्मचाऱ्यांसोबत हा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज प्रभाग क्रमांक १३ यमुनानगर निगडी येथील सर्व आरोग्य महिला कर्मचाऱ्यांसोबत महिला दिन साजरा करण्यात आला..
यावेळी प्रिया प्रसाद कोलते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की श्रमाच्या पराकष्टाने ज्यांनी आनंदाची पालवी फुलवली… धैर्याने स्वप्न साकारण्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली… कणखरतेचे प्रतीक असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसोबत महिला दिन साजरा करता आला याचा विशेष आनंद आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केक कापण्यात आला, सर्व महिलांना अल्पोपहार आणि सोबतच छोटीशी भेटवस्तूही देण्यात आली. तसेच प्रसाद कोलते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या आरोग्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या सर्व आरोग्य महिला भगिनींना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माणुसकी फाउंडेशनचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने आरोग्य महिला भगिनी उपस्थित होत्या.