शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
जागतिक महिला दिनानिमित्त कै. भीमराव जवळकर विकास संस्था यांच्या वतीने लांडेवाडी येथील महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या हॉलमध्ये महिला बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन सौ. मंजिरी कोठुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्पर्धेचा बक्षीस समारंभ सौ.प्रतिभा रघुनाथ जवळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशनने महिला चषक 2023 पटकाविला. या स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढील प्रमाणे सुवर्णपदक विजेत्या खेळाडू अन्वेषा शिंदे कन्हैया कलशेट्टी तनुष्का कलशेट्टी ऋतुजा सोनकांबळे पलक ओसवाल श्रद्धा प्रसाद वैष्णवी शिंगोटे, साक्षी कराळे कल्याणी खोंडगे अनुष्का साठे मयुरी साठे अस्मिता साठे ऐश्वर्या साठे प्रणाली शिंदे रौप्य पदक विजेत्या खेळाडू स्नेहल कांबळे, ज्ञानेश्वरी साळुंखे, अवनी हांडे, तनवी गव्हाणे, चैत्राली लांडगे, देवेंद्र सिंग यादव सदानंद साबळे विश्वजीत कांबळे अमोल निचळ यांनी पंच म्हणून काम पाहिले.यावेळी रघुनाथ जवळकर ,डॉ .मदन कोठुळे राष्ट्रीय पंच मुष्टीयुद्ध सचिन शिंगोटे किरण सूर्यवंशी आदी मान्यवर व महिला उपस्थित होते.