शबनम न्यूज | मुंबई
मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात महेंद्रसिंह धोनीची गुरुवारी सर्जरी करण्यात आली. धोनीच्या गुडघ्यावर कोकिलाबेन रुग्णालयात ऑपरेशन झाले. आयपीएल टूर्नामेंटच्या पहिल्याच मॅच वेळी धोनीला दुखापत झाली होती. गुजरात विरोधात आयपीएल मॅच खेळताना धोनी जखमी झाला. या मॅचच्या 19 व्या शतकात दीपक चाहर ने टाकलेला चेंडू अडवण्यासाठी धोनीने ड्राइव टाकली, त्यानंतर धोनीलाही दुखापत झाली. धोनीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली, त्यानंतर कसतरी तो उभा राहिला, काही वेळ आराम केल्यानंतर तो पुन्हा विकेट कीपिंग साठी आला.
मॅच नंतर सीएसकेचे मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले की, टूर्नामेंटच्या पहिल्या मॅचमध्ये धोनीच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो इतर सामन्यावेळी गुडघ्याला पट्टी बांधून खेळत होता. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे धोनीला संपूर्ण इनिंग मध्ये फलंदाजी करणे शक्य झाले नाही, त्यामुळे यंदा त्याची कामगिरी खालवली. पीचवर तो धावून रन्स घेण्याऐवजी मोठे शॉट मारताना दिसला.