शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
मालमत्ताकर, पाणीपट्टी यांत कोणतीही करवाढ – दरवाढ नसलेला सन २०२३ – २४ या आगामी आर्थिक वर्षाचा ५ हजार २९८कोटी रुपयांचा मूळ तर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह ७ हजार १२७ कोटी रुपयांचा प्रारुप अर्थसंकल्प लेखा विभागाने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मंगळवारी स्थायी समितीला सादर केला. अर्थसंकल्पात जुन्याच योजनांना मुलामा लावला आहे. ६ कोटी ३० लाख रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात जुन्या योजनांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे.
स्थायी समितीची विशेष सभा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी अर्थसंकल्प तयार केला आहे. आयुक्त शेखर सिंह यांचा आपल्या कारर्कीदीतला पहिला अर्थसंकल्प असून महापालिकेचा हा ४१ वा अर्थसंकल्प आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, प्रदीप जांभळे पाटील आदी उपस्थित होते.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये –
१) विविध विकास कामांसाठी १८०१ कोटी ३५लाख
२) शहरी गरिबांसाठी १५२४ कोटी
३) महिला योजनेसाठी योजनांसाठी ४८कोटी २४ लाख
४) क्षेत्रीय स्तरावरील विकास कामांसाठी १५० कोटी
५) पाणी पुरवठा विशेष निधी १५४ कोटी
६) अमृत योजना तरतूद २० कोटी
७) स्थापत्य विशेष योजना ८४६ कोटी
८) स्मार्ट सिटी तरतूद ५० कोटी
९) दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी ४५कोटी ६ लाख
१०) पीएमपीएलसाठीची तरतूद २९४कोटी
११) अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकरिता १० कोटी ५० लाख
१२) भूसंपानासाठी १२० कोटी.