शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
प्रभाग क्र. १३ निगडी येथील कै. मधुकर पवळे क्रीडांगणाची अवस्था बेकार झाली असून, सदर क्रीडांगण लवकरात लवकर क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष, सचिन चिखले यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील प्रभाग क्र. १३ परिसरातील निगडी यमुनानगर मधील कै. मधुकर पवळे क्रीडांगण हे गेली अनेक दिवस फ प्रभाग स्थापत्य यांच्या ताब्यात आहे, त्यामुळे या क्रीडांगणाचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे. याच क्रीडांगणामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे, काही ठिकाणी मोडतोड झाली आहे . सुरक्षारक्षक नाही , त्याप्रमाणे भटकी जनावरे व कुत्रे यांचा वावर जास्त त्यामुळे अनेक क्रीडाप्रेमी नाराज झालेले आहेत. तरी कै. मधुकर पवळे क्रीडांगणाचा विकास होण्यासाठी सदर क्रीडांगण हे लवकरात लवकर क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करावा. वर्ग केले नाहीतर लवकरच जनआंदोलन घेतले जाईल, असा इशाराही सचिन चिखले यांनी दिले आहे.