विशेष लेख | गजाला सय्यद
कोरोना पाठोपाठ आता नवीन व्हायरस नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. H3N2 या व्हायरसचा देशात मोठ्या प्रमाणात फैलाव सुरु झाला. त्यानंतर राज्यात ही या व्हायरसची रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जिल्यात, शहरात H3N2 चे रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून लवकरच या व्हायरसच्या उपाययोजनेची निर्बंध लागू करण्यात येतील, कारण कोरोना सारखेच H3N2 चे रुग्णांत वाढ न व्हावी या करीता प्रशासन कटीबद्ध झाले आहे. अनेकठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहे. H3N2 या व्हायरसला स्नाइन फ्लू देखील म्हंटले गेले आहे. H3N2 फ्लू विषाणू H1N1 फ्लूचा उपप्रकार आहे. बदलत्या हवामानामुळे या विषाणूचं म्युटेशन झालं आहे. सध्या या विषाणूचा पसरणारा प्रकार अधिक धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. या विषाणूची लक्षणे कोरोनासारखी आहेत. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी याची लक्षणे वेळीच ओळखणं आवश्यक आहे. लहान मुले, वृद्ध आणि गरोदर स्त्रिया यांना या विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक आहे. लहान मुलं, वृद्ध आणि गरोदर महिलांमध्ये या विषाणूची लक्षणे वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतात.
H3N2 च्या संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सर्दी, खोकला आणि ताप या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, हा व्हायरस सर्दी खोकला याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे सर्दी, खोकला झाल्यास त्वरित डॉक्तरांकडे जावे, तसेच या आजाराशी घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घ्यावी. नियमितपणे आपले हात पाण्याने आणि साबणाने स्वच्छपणे धुवावे, खोकताना किंवा शिकताना नाक आणि तोंडावर रुमाल ठेवावा, कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर शहरात गर्दीची ठिकाणे आढळून येत आहेत. नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे तसेच बाहेर जाताना मास्कचा वापर करणे तसेच सर्दी, खोकला, ताप याची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या संपर्कात रहावे, ही सर्व काळजी नागरिकांनी घ्यावी.
तसेच लहान मुलांना या संसर्गाचा मोठ्या प्रमाणात धोका आहे. त्यांना तीव्र ताप, पोटदुखी, मळमळ, उलट्या, खोकला, सर्दी, कफ न निघणे किंवा निमोनियाचे लक्षणे दिसू लागतात तर गर्भवती महिलांना देखील या संसर्गाचा धोका आहे. गर्भवती महिलांमध्ये देखील काहीशी वेगळी लक्षणे दिसतात अशा महिलांना तीन दिवसांपेक्षा जास्त ताप असल्यास काळजी घ्यावी आणि वेळेत डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा, त्यांना खोकला आणि सर्दी, जास्त कफ, अंगदुखी, डोकेदुखी असे या संसर्गाचे लक्षणे गर्भवती महिलांवर दिसून येतात. काही व्यक्तींना नेहमी व्हायरल सर्दी, खोकला किंवा ताप या संसर्गाला बळी पडावे लागते. काही लोकांना फुफ्फुसाच्या गंभीर संसर्गाचा ही सामना करावा लागतो, अशा लोकांना छातीत कफ जमा झाल्यामुळे वेदना, ताप, श्वास घेण्यास त्रास, घसा दुखी, कानात जडपणा येणे ही लक्षणे देखील या संसर्गाशी संबंधित असू शकतात.
व्हायरसच्या बचावासाठी काय करावे?
- आजारी व्यक्तीला भेटायला जाताना किंवा व्हायरसच्या प्रादुर्भावाशी लढा देत असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर काळजी घ्या.
- गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
- बाहेर पडताना मास्क वापरा.
- हातांच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या.
- जेव्हा तुम्ही आजारी असाल तेव्हा स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्याकडून संक्रमण पुढे होणार नाही.