शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
प्रभाग क्रमांक २४, विकास नगर, किवळे, मामुर्डी साईनगर सह परिसरामध्ये अत्यंत कमी दाबाने पिण्याचे पाणी सोडले जाते. तसेच पाणी सोडण्याच्या क्षमतेपेक्षा कमी पाणी प्रभागाच्या वाटेला येतो. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना पाण्याची बचत करता येत नाही. तसेच पाणी पुरतही नाही, त्यामुळे तेथील महिलांना तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्याला सामोरे जावे लागते, याकरिता युवा सेनेचे राजेंद्र तरस यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना महिलांचा हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
या प्रभागातील नागरिकांकरिता पुरेसे पाणी मिळावे, त्याचप्रमाणे या प्रभागात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राजेंद्र तरस तसेच या प्रभागातील रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
Advertisement