शबनम न्यूज वृत्तसंस्था मुंबई
दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली ही भेट कोणतीही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट होती अशी माहिती शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे दिली आहे यापूर्वीही रजनीकांत आपल्या रोबोट चित्रपटाच्या प्रमोशन वेळी मुंबईला आले असता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती ,उद्धव बाळासाहेब ठाकरे व रजनीकांत यांचे कौटुंबिक व सामाजिक संबंध चांगले आहेत या निमित्ताने त्यांनी मुंबई दौरा दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली यावेळी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे उपस्थित होते.
Advertisement