पिंपरी : एमएसईबी इन्स्पेक्टर बोलत असल्याचे सांगून एकाची ९५ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार गुरुवारी (दि. १६) सकाळी रामनगर कॉलनी, बावधन येथे घडली. सुहास रामचंद्र गगनग्रास (६३, रा. रामनगर कॉलनी, बावधन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजकुमार यादव नाव सांगणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अनोळखी
व्यक्तीने फोन केला. एमएसईबी इन्स्पेक्टर बोलत असल्याचे सांगून, आरोपीने फिर्यादी यांचे वीजबिल थकले आहे. रात्री साडेनऊपर्यंत वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे सांगून फिर्यादीस एनी डेस्क अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्यावरून ९५ हजार ७०० रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.