शबनम न्युज | पिंपरी
आयपीएल क्रिकेट मॅच वर सट्टा घेणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणीविरोधी पथक, गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप, 5 वह्या, 2 पेन व 4500 रुपये रोख रक्कम असा एकूण 96 हजार 785 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रोमी सुरेश नेहलानी (वय 36, रा. पिंपरी पुणे), विनोद राजू सतीजा (वय 32, रा.पिंपरीगाव) लखन राजू गुरुवाणी (वय 24, रा.पिंपरी पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेक पॅराडाईज सोसायटी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ या ठिकाणी काही लोकांकडून आयपीएल क्रिकेट मॅच वर सत्ता लावण्यासारखे अवैध धंदे चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता, त्यांनी या ठिकाणी छापा मारून तिघांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव आखाडे हे करत आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया ,अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त,गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस अंमलदार सुनील कानगुडे, निशांत काळे, किरण काटकर, विजय नलगे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, प्रदीप गुट्टे व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस हवालदार नागेश माळी यांनी केली.