मुस्लिम धर्मीयांची रमजान ईद उत्साहात साजरी
शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
आज मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. रमजान ईद निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड येथील इदगाह मैदानात रमजान ईद ची नमाज संपन्न झाली या रमजान ईद निमित्त अनेक मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ची नमाज अदा केली पिंपरी चिंचवड शहरात अनेक मस्जिद मध्ये रमजान ईद ची नमाज संपन्न झाली.
रमजान ईद निमित्त पोलीस प्रशासन वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. रमजान ईद च्या निमित्ताने अनेक मुस्लिम बांधव हे एकत्रित आले व आनंदाने ईद साजरी केली .रमजान हा महिना मुस्लिमांसाठी पवित्र असा महिना समजला जातो या रमजान महिन्यात मुस्लिम महिन्याभराचा उपवास करत असतात नमाज तसेच जकात ,फितरा असे अनेक विविध उपक्रम या रमजान महिन्यात राबविले जातात, अनाथ, गरीब कुटुंबांना मदत व्हावी यासाठी जकात व फितरा देणे बंधनकारक असते आज प्रत्येक मुस्लिम बांधव हा उत्साहाने व आनंदाने रमजान ईद साजरी करत असतो.