- आदर्श शिक्षण संस्था दिघी रोड भोसरी संस्थेने जाहीर केली मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी ५०% फी माफी
- शिक्षक पालक समिती व शाळा व्यवस्थापन समितीने संस्थेचे मानले आभार
शबनम न्यूज | भोसरी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आज आदर्श प्राथमिक विद्यालय भोसरी येथे शाळा व्यवस्थापन समितीची आज मासिक सभा नियोजित वेळेत पार पडली. मार्च २०२० पासून आपले संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर कोरोनामुळे बेहाल झालेले आहे. दैनंदिन व्यवसाय,कामधंदा आणि महीला व मजूर वर्ग सुद्धा या काळामध्ये आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
हे लक्षात घेऊनच संस्थेने मागिल वर्षाप्रमाणे याही वर्षी कोरोना काळातील पालकांची आर्थिक परिस्थिती पाहून बालवर्ग ते १० वी विद्यार्थ्यांना ५० टक्के फी माफी संस्थेच्या मासिक सभेत सर्वानुमते निर्णय घेऊन जाहीर केली . आजच्या प्राथमिक विभागाच्या त्रैमासिक सभेत पालकांतर्फे संस्थेचे अध्यक्ष प्रविण बारसे सर व सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले.
संस्था गेली ३५ वर्ष भोसरी परिसरात मराठी माध्यमाची शाळा चालवत असून या शाळेत सर्वसामान्य घरातली मुले उच्च दर्जाचे शिक्षण घेत आहेत. सभेत प्रवेशप्रक्रीया,सेतु अभ्यासक्रम, दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण,कोरोना काळातील मुलांचे ऑनलाइन शिक्षण,घ्यावयाची काळजी , स्वच्छता आदि विषयांवर चर्चा झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी समितीच्या अध्यक्षा कान्होपात्रा ताई तर समिती सचिव म्हणुन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रियांका बारसे यांनी काम पाहीले.
तर सुजाता माने ,वैशाली गिरी, ज्ञानेश्वर मोडक ,सुकेशिनी आंग्रे, प्रतिभा लोकरे, जयेंद्र निवळकर, माया पोटे,अंजली नखाते आदि सदस्य उपस्थित होते.