शबनम न्युज | मुंबई
मुंबईतील बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या परिस्थितीचा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. प्रशासनाने समज दिल्यानंतर देखील स्थानिक नागरिक बारसू रिफायनरी प्रकल्पा विरोधातच्या आंदोलनावर ठाम आहेत.
खासदार विनायक राऊत यांच्याकडून उद्धव ठाकरे यांनी फोनवर माहिती घेतली. ठाकरे गट स्थानिकांसोबत असल्याचं या अगोदर स्पष्ट केला आहे. खासदार विनायक राऊत आज मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची याविषयी भेट घेत चर्चा करणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे याबाबत लवकरच आपली भूमिका जाहीर करणार आहेत, अशी माहिती आहे.
या प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वेक्षणाच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांचे वाहन अवघड वळणाचा अंदाज आल्याने रस्त्याच्या बाजूला उलटून 16 पोलीस अंमलदार किरकोळ जखमी झाले. आडीवरे गावाजवळ कशेळीकोंड येथील उतारावर सकाळी ही दुर्घटना घडली.