पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 14 मध्ये कीटकनाशक औषध फवारणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल दळवी यांनी केली आहे त्यांनी आपले मागणीची निवेदन मुख्य आरोग्य अधिकारी अ क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे दिले आहे दिले निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे की शहरातील प्रभाग क्रमांक १४ विठ्ठलवाडी दत्तवाडी विवेक नगर तुळजाई वस्ती एकता नगर टेल्को कपूर सोसायटी क्रांतीनगर गंगानगर गणेश नगर गुरुदेव नगर या सर्व भागा मधी मच्छर डास किडे यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे
सदर परिसरातील नागरिकांना हैरान झाले आहेत परिसरात नागरिकांना डेंगू चिकनगुनिया मलेरिया यांसारखे आजार होत आहेत नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सदर परिसरात नियमितपणे कीटकनाशक औषध फवारणी होत नाही व मच्छरांवरती धूर फवारणी होत नाही तरी आपल्या या सर्व परिसरात नियमितपणे कीटकनाशक औषध फवारणी व धुर फवारणी करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे तरी आपणास विनंती आहे सदर विभागास सूचना करून या सर्व परिसरात नियमितपणे कीटकनाशक औषध फवारणी व मच्छर धूर फवारणी करण्यात यावी यासाठी स्थानिक नागरिकांच्या वतीने निवेदन देत आहे असे निखिल उमाकांत दळवी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे