शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत चिंचवड मतदार संघातील विविध नागरी समस्या करिता व रखडलेले प्रकल्प प्रलंबित कामाबाबत आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी सर्व माजी नगरसेवकांसह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीयुत शेखर सिंह यांच्या समवेत आढावा बैठक घेतली.
सदर बैठकीस चिंचवड मतदारसंघ निवडणूक प्रभारी मा. नगरसेवक शंकरशेठ जगताप, मा. सभागृह नेते नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, राजेंद्र गावडे, अंबरनाथ कांबळे, सुरेश भोईर, शशिकांत कदम, सागर अंगोळकर, अभिषेक बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, संदीप कस्पटे, बाबा त्रिभुवन, हर्षल ढोरे, शेखर ओव्हाळ, संतोष कांबळे, मोरेश्वर शेडगे, राजेंद्र राजापुरे, स्थायी समिती माजी अध्यक्षा सौ.ममता विनायक गायकवाड, मा.नगरसेविका सौ.संगीता भोंडवे, सौ.उषा मुंढे, सौ.सविता खुळे, सौ. सुनिता तापकीर, सौ.मनीषा पवार, सौ.नीता पाडाळे, सौ.शारदा सोनवणे, सौ.निर्मला कुटे, श्रीमती अश्विनी चिंचवडे ,श्रीमती आरती चोंधे व मनपा अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता व खाते प्रमुख उपस्थित होते.
सदर बैठकीत सोबत जोडलेल्या विषयांसोबत मा.नगरसेवक , नगरसेविका यांनी आपल्या प्रभागातील रखडलेली विकास कामे व अडीअडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले.