शबनम न्युज | पुणे
कोंढवा परिसरात विहिरीत बुडून एका सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. साई भगवान यादव असे मुलाचे नाव असून, साई हा बुधवारी दुपारी मित्रांसोबत खेळत असताना विहिरीत पडला विहिरीत बुडून त्याचा मृत्यू झाला.
बुधवारी सायंकाळी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी साईचा मृतदेह बाहेर काढला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलगा विहिरीजवळ मित्रांसोबत खेळत होता. विहिरीला पाणी काढण्यासाठी तीन पुली बसवल्या आहेत, मुलगा या पुलींच्या स्टीलच्या रॉडशी खेळत होता, तेव्हा तो विहिरीत पडला. मुलगा पडल्याचे स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. ही विहीर 70 फूट खोल असून त्यात 60 फूट पाणी भरले होते. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तसेच इतर तज्ञ स्वयंस्वयक अधिकाऱ्यांनी संध्याकाळी 5 च्या सुमारास मुलाचा मृतदेह बाहेर काढला.
Advertisement