शबनम न्युज | पिंपरी
१ मे २०२३ महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते भारतीय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सर्व उपआयुक्त, शहर अभियंता, सह शहर अभियंता, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच विविध विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी शहर वासियांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Advertisement