शबनम न्युज | पिंपरी
“हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” शुभारंभ शासन स्तरावरुन मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला . तसेच आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “ हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ” शुभारंभ सावतामाळी मंदीर, चिखली घरकुल, प्राथमिक शाळा, जाधववाडी येथे करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, उप आयुक्त रविकिरण घोडके,माजी महापौर राहुल जाधव आदि उपस्थित होते.
Advertisement