शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती उड्डाणपूल परिसरातील निगडी प्राधिकरण येथील मोकळ्या जागेसाठी हलगी बजाव आंदोलन करून पीएमआरडीचे आयुक्त राहुल महिवाल यांना आंदोलनकर्त्यांच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले.
आंदोलन कारण मध्ये सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, माजी नगरसेवक सचिन चिखले, मानव कांबळे, सतीश काळे, काशिनाथ नकाते, भाऊसाहेब आढागळे, शिवाजी साळवे, मयूर जाधव, नामदेव जाधव, गणेश भांडवलकर, युवराज कोकाटे, देवेंद्र तायडे, संजय ससाने, ब्रह्मानंद जाधव, आलम बाबा, शेख सचिन, काळभोर रोहिदास, शिवनेकर संतोष इंगळे, मुकर्ताल मामू, रईस शेख, रशीद अत्तर, सचिन बोराडे, रमेश गायकवाड, हौसराव शिंदे, दिगंबर बालूरे ,दादासाहेब जोगदंड, संतोष शिंदे ,वैभवी घोडके, सविता आव्हाड, जयराम लांडगे, नासिर शेख, रमेश पवार, सागर यादव, वैभव फाळके ,बाळासाहेब गवळी, जितेंद्र शिगवण, अरुण रणदिवे, भीमराव थोरात, दिलीप जोंधळे, जय सकट, लक्ष्मण राजवडे, वैशाली पवार ,प्रकाश जाधव, दशरथ कांबळे, कविता सकट, प्रदीप घोडके, बाबा आलम, राजू धुरंदरे नेते , बापु घोलप. , आरुण जोगदंड , संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
यांनी या जागेसाठी आंदोलन करत मागणीची निवेदन दिले. सदर निवेदनात पुढील प्रमाणे मागण्यानमूद करण्यात आल्या आहे.
१) या शिवछत्रपतींच्या जयंती उत्सवाचा भूखंड बाबत पी एम आर डी ए व बांधकाम व्यवसायिकांमध्ये झालेले सर्व व्यवहार रद्द करण्यात यावेत.
२) या जागेत राज्य सरकार महानगरपालिका व पी एम आर डी ए ने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर भव्य दिव्य “शिवसृष्टी” उभारण्यात यावी.
३) मनपाच्या वतीने होणारी शिवजयंती सालाबाद प्रमाणे याच जागेवर व्हावी.
४) मनपाच्या वतीने होणारी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव याच जागेवर व्हावी.
५) भक्ती शक्ती शिल्पसमूहासमोरील पी एम पी एल डेपोच्या जागेवर मेट्रोचे अखेरचे स्टेशन होणार. त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे स्थलांतर करावे लागणार. त्यामुळे अण्णाभाऊंचा पुतळा याच जागेत बसवण्यात यावा.
६) मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमांसाठी या जागेचा वापर करण्यात यावा.
७) समस्त निगडी ग्रामस्थांच्या “गाव जत्रेचा” व कुस्त्या आदि कार्यक्रम याच जागेत होतात.