पिंपरी, पुणे (दि.१० मे २०२३) विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षण घेताना आधुनिकतेची कास धरत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगामध्ये नवनवीन संकल्पना राबवाव्यात. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्यासाठी सतत प्रयत्नशील रहावे तसेच त्या माध्यमातून आपले तंत्र विकसित करत अर्थार्जन प्राप्त करावे. संशोधनामध्ये सांघिक प्रयत्नांना खूप महत्त्व आहे, त्याशिवाय यशाला गवसणी घालता येणार नाही, असे प्रतिपादन डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. बालसुब्रमण्यम यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय (पीसीसीओईआर) रावेत, येथे ‘टेक्नोवेट-२०२३’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी चे अधिष्ठाता डॉ. बालसुब्रमण्यम बोलत होते. यावेळी अक्युमेन टुडे कंपनीचे संचालक अतुल बेनगिरी, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी उपस्थित होते.
अतुल बेनगिरी म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात बहुविद्याशाखीय दृष्टिकोन आत्मसात केला पाहिजे, तरच नवउद्योजिकतेला गवसणी घालता येईल. ‘टेक्नोवेट – २०२३’ मध्ये विविध तंत्रज्ञानावर आधारित रोबोरेस, टेक्नो फायर, कॅडमास्टर, रॉकेट लीग, ड्रोन चॅलेंजेस , ब्रिज निर्मिती, पेपर प्रेझेंटेशन कोड कॉम्बॅट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील ४६० पेक्षा अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला.
एक्सपेंडिशन हंट स्पर्धेत प्रथम क्रमांक पीसीसीओईआर, व्दितीय क्रमांक आरएससीओई; निर्मिती ब्रिज मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक पीसीसीओईआर; क्विझो ट्रॉनिक्स स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक पीसीसीओईआर, हवक्रेस स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक क्रमांक एमआयटी आळंदी; सरवाइव द फॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक पीसीसीओईआर; कॅड ओ क्रिएट स्पर्धेत गोरमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अवसरी, व्दितीय क्रमांक पीसीसीओईआर; टेक्नो फायर स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पीसीसीओईआर; ब्रो कोड स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पीसीसीओईआर; कोड कॉमबॅट स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पीआयसीटी च्या संघांनी पारितोषिक पटकावले. या स्पर्धेतील बहुतांशी गटात पीसीसीओईआर ने वर्चस्व राखले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.
स्वागत प्राचार्य डॉ. हरीश तिवारी आणि आभार समन्वयक प्रा. त्रिवेणी ढमाले यांनी मानले.