शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात भारतीय जनता पक्षाच्या विकसित भारत संकल्प यात्रा 2024 अंतर्गत नागरिकांना विविध सेवा विनामूल्य दिल्या जात आहेत. यात प्रामुख्याने भाजपचे माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, युवा नेते जयदीप माने, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रवी भिलारे व महिला आघाडीच्या अध्यक्षा करिष्मा बारणे यांच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड ज्यांचे रेशन कार्ड चालू आहे, त्यांना त्वरित हे काढ मिळवून देण्यात येत आहेत.
तसेच आधार कार्ड अपडेट आणि नवीन आधार कार्ड त्वरित मिळविण्यासाठी त्याचप्रमाणे प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजनेतून हातगाडी वाले. टपरीवाले .छोटे व्यावसायिक. रस्त्यावर व्यावसाय करणाऱ्यांना दहा हजार, वीस हजार, पन्नास हजार रुपयापर्यंतचे त्वरित कर्ज मंजूर करून देणारे योजना तसेच आरोग्य तपासण्या सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करून देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे उज्वला योजनेचा लाभ ही या योजनेतून मिळून देण्यात येणार आहे व केंद्रशासन यांच्यामार्फत मिळणाऱ्या सर्व योजना नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तरी या सर्व सुविधांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. सदर योजना या शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत थेरगाव परिसरातील गुजर नगर बस स्टॉप येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत, तरी अधिक माहितीसाठी ९००५९६४५४५/ ८६००२०१२१२/ ९०१११२६८८८ या नंबर वर संपर्क साधण्याची आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.