शबनम न्युज | मुंबई
कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (१३ मे) होत आहे. यामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. यावरून कर्नाटक मध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान यावर महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, सुरुवातीचे निकाल येत आहेत. दुपारपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल. आता जे निकाल येत आहेत त्यात खूप फरक नाही. खूप मोठा फटका नाही पूर्ण निकाल आल्यावर चर्चा होईल. स्थानिक राज्याच्या निवडणुकांचे विषय वेगळे असतात. केंद्राशी याला जोडणे बरोबर नाही. सरकारविरोधी जनमताचा (अँटी इन्कमबन्सी) परिणाम जाणवतो. संपूर्ण निकाल आल्यावर केंद्रीय नेतृत्वाची प्रतिक्रया येईल. असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.
Advertisement