शबनम न्युज | कर्नाटक (वृत्तसंस्था)
कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (१३ मे) होत आहे. या मतमोजणीस काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. या निवडणुकीत कोणाचा विजय होतो व कोणाचा पराभव याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
- कर्नाटक मध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय!!
काँग्रेस – 132
भाजप – 66
जेडीएस – 22
इतर – 4
- कर्नाटकात काँग्रेसची १२८ जागांवर आघाडी
काँग्रेस – १२८
भाजपा -६६
जेडीएस – २२
इतर – ०६
- कर्नाटकात काँग्रेसची १२१ जागांवर आघाडी –
काँग्रेस – १२१
भाजपा – ७२
जेडीएस – २४
इतर – ०७
- निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार कुणाला किती मतदान?
काँग्रेस – ४२.९३ टक्के
भाजपा – ३६.१७ टक्के
जेडीएस – १२.९७ टक्के
#KarnatakaElectionResults2023 | As per the latest ECI data, Congress gets 42.93% vote share, BJP gets 36.17% vote share while JDS receives 12.97% vote share. pic.twitter.com/GBDa0LntqB
— ANI (@ANI) May 13, 2023
Advertisement
- दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल – राधाकृष्ण विखे पाटील
सुरुवातीचे निकाल येत आहेत. दुपारपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल. आता जे निकाल येत आहेत त्यात खूप फरक नाही. खूप मोठा फटका नाही पूर्ण निकाल आल्यावर चर्चा होईल. स्थानिक राज्याच्या निवडणुकांचे विषय वेगळे असतात. केंद्राशी याला जोडणे बरोबर नाही. सरकारविरोधी जनमताचा (अँटी इन्कमबन्सी) परिणाम जाणवतो. संपूर्ण निकाल आल्यावर केंद्रीय नेतृत्वाची प्रतिक्रया येईल.
– राधाकृष्ण विखे (महसूलमंत्री, महाराष्ट्र)
- निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार कोण किती जागांवर आघाडीवर?
काँग्रेस – १२०
भाजपा – ६९
जेडीएस – २६
इतर – ०८
#KarnatakaElectionResults2023 | Congress leading in 120 constituencies, BJP ahead in 69 seats while JD(S) leads in 26 seats & Independent- 5 pic.twitter.com/L6p3ijcPUz
Advertisement— ANI (@ANI) May 13, 2023
- कर्नाटक निकालाचे कल जाहिर होताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया –
कर्नाटकात काँग्रेस केवळ आघाडीवर नाही, तर सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय कर्नाटकमधील भाजपाचा पराभव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारला पाहिजे. या दोन प्रमुख नेत्यांनी कर्नाटकात अक्षरशः तंबू ठोकला होता.
– संजय राऊत
- कनकपुरा मतदारसंघात कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची आघाडी
कनकपुरा मतदारसंघात कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची आघाडी, भाजपाचा उमेदवार आर. अशोक मागे !