शबनम न्युज | कर्नाटक (वृत्तसंस्था)
कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे.
काँग्रेसला एकूण 132 जागा मिळाल्या तर भाजपला 66 जागांवरच समाधान मानावे लागले तर जेडीएसला 22 जागा मिळाल्या तर इतर जागा 4 असा हा निकाल लागला असून, काँग्रेसचा कर्नाटकात मोठा जल्लोष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने साजरा होत आहे.
Advertisement
कर्नाटकात काँग्रेसला मिळालेला विजय हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. भारतीय जनता पार्टीला फक्त 66 जागा मिळाल्या असून कर्नाटकाच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला नाकारले, राहुल गांधी यांनी देशभर ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती, याचाच फायदा काँग्रेसला झाला आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार विजयी झाले. काँग्रेसचे कर्नाटकात सत्ता स्थापना साठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
Advertisement