शबनम न्युज | पिंपरी
रविवार दि.२३ एप्रिल २०२३ रोजी मा. श्री. तानाजी पवार यांचे आनंदगंगा फौंडेशन कोल्हापूर यांचे मार्फत क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३ चे मोठ्या शानदार कार्यक्रमाने वितरण करण्यात आले याप्रसंगी पुणे जिल्ह्यातून दोन गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली होती.
यामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील संस्थापक गोविंद दाभाडे सर यांच्या नवनगर शिक्षण मंडळाचे सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी या प्राथमिक शाळेतील शिक्षिका लता अण्णा नवले ( सौ. शितल भानुदास औटी ) यांची निवड करण्यात आली होती. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. याकरिता शाळेचे मुख्याध्यापक माळे सर यांचे फार मोठे सहकार्य लाभले. या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमासाठी स्थानिक गट शिक्षण अधिकारी व सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.